![]()
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील राजे ग्रुप बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने इतर अवाजवी खर्चाला फाटा शिवजयंतीनिमित्त गावात बोअर घेऊन पाणीटंचाई दुर करण्याचा प्रयत्न केला आहे.
नारायण चिंचोली या गावात प्रसिध्द सुर्यनारायणाचे प्राचीन मंदिर असून गावाला तिर्थक्षेत्राचा दर्जा आहे. गावात सर्व सोयी-सुविधा आहेत. गावाची लोकसंख्या 3 ते 4 हजाराच्या आसपास आहे. मात्र सध्या या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे. होते ते पाण्याचे स्त्रोत आटलेले आहेत. याचे गांभीर्य पाहुन या वर्षी शिवजयंती निमित्त होणार्या सर्व खर्चाला फाटा देत वरील सामाजिक संस्थेच्या वतीने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न म्हणून बोअर घेत एका आगळ्या प्रकारचा शिवजयंती उत्सव साजरा करुन सर्वांसमोर एक नवा आदर्श घालुन दिला आहे.
येथील राजे ग्रुप बुउद्देशीय सामाजिक संस्थेचे शिवजयंतीचे हे सातवे वर्षे आहे. दरवर्षी भव्य प्रमाणात रक्तदान शिबीराचे आयोजन संस्थेच्या वतीने केले जाते. या वर्षीही 70 जणांनी रक्तदान केले आहे. मिरवणुक वगैरे इतर अनाठायी खर्च करण्यापेक्षा समाजाला उपयुक्त पडेल असे कार्य करण्याकडे संस्थेचा कल असतो. समाजप्रबोधन व्याख्यानासह संस्थेने केलेल्या वरील उपक्रमाचे तालुक्यातून सर्वत्र कौतुक होत आहे.
आज दि.19 फेब्रुवारी रोजी नारायण चिंचोली येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये, पंढरपूर पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांच्या शुभहस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे पुजन करुन पुष्पहार अर्पण केला. शिवछत्रपतींना मानवंदना देण्यात आली. व यानंतर बोअर घेण्याचा शुभारंभ करण्यात आला. जय भवानी.. जय शिवाजी… सुर्यनारायण देवा यश दे! च्या जयघोषात श्रीफळ फोडून बोअर घेणेचे कामाचा शुभारंभ झाला.
यावेळी पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष रामचंद्र सरवदे, उपाध्यक्ष भगवान वानखेडे, राजेंद्र कोरके सल्लागार नंदकुमार देशपांडे, दिनेश खंडेलवाल, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण धनवडे, सरपंच नितीन मस्के, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शिवाजी गुंड, सुर्यनारायण ट्रस्ट चे अध्यक्ष लक्ष्मण कोल्हे, सोसायटीचे चेअरमन धर्मराज नलवडे, व्हा.चेअरमन विष्णु माने, माजी चेअरमन दत्तात्रय कोल्हे, उपसरपंच बळवंत धनवडे, ग्रा.पं. सदस्य पोपट पाटील, दादा कोळेकर, अभिजीत कवडे, प्रा.दत्तात्रय मस्के, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल माने, अध्यक्ष राहुल मलपे, उपाध्यक्ष नितीन गुंड, सचीव सनी वाघ, सहसचिव ॠषीकेश मस्के, मारुती वाघमोडे यांचेसह शिवलिंग हिंगमिरे, श्रीमंत खरात, सुरेश खरात, गणेश आवताडे, सुनील पाटील, रमेश नाझरकर, बापु घाडगे, शिवाजी वसेकर, सौदागर गुंड, नानासाहेब चौगुले, हणुमंत गुंड, हणुमंत कोळेकर आदींसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

