![]()
पंढरपूर : पंढरपूर येथील पंढरपूर युवा मुद्रक संघाच्या वतीने 24 ङ्गेब्रुवारी ‘‘ जागतीक मुद्रक दिन’’ चे आयोजन करण्यात आले होते. मा.श्री.सुरेश शहा मा.अध्यक्ष महाराष्ट्र मुद्रण परिषद यांचे शुभहस्ते, मा.श्री.बाळासाहेब बडवे ज्येष्ठ पत्रकार यांचे अध्यक्षतेखाली तर प्रमुख पाहुणे म्हणून गणेश दाते मा.अध्यक्ष पुना प्रेस असोशिएन हे होते.
पंढरपूरात नव्यानेच सुरू झालेली पंढरपूर युवा मुद्रक संघ यांचे वतीने मुद्रक दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मुद्रण क्षेत्रात किती कष्ट आहेत, काम करताना गुणवत्ता देणे महत्वाचे आहे. यासाठी कामगाराचे मोठे योगदान असते त्या कामगाराचा सन्मान करणे हे युवा मुद्रक संघाने ठरविले. यावेळी संघाचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी सर्व मुद्रणालयातील ज्येष्ठ मुद्रकांचा सत्काराचे नियोजन केले. मुद्रण क्षेत्रात ज्या कामगाराने योगदान दिले त्या कामगाराचा सत्कार व त्याचा सन्मान करणे हे पंढरपूर युवा मुद्रक संघाचे कर्तव्यच आहे.
मा.सुरेश शहा मा.अध्यक्ष महाराष्ट्र मुद्रण परिषद यांचे शुभहस्ते झाला यावेळी बोलताना शहा म्हणाले की ,मुद्रकांची अवस्था ङ्गार वाईट झाली आहे. प्रत्येक मुद्रकांने असे ठरविले पाहिजे की मी केलेल्या कामाचा योग्य मोबदला मला मिळाला पाहिजे, कुठलेही काम मी कमी दरात करणार नाही, मी इतके दिवस या क्षेत्रात काम करीत आहे. दरवेळेस दराची चर्चा होते. पण पंढरपूरातील मुद्रकांनी दरपत्रक काढून आपली एक दिशा ठरविली आहे. तर मुद्रकांनी त्यांचा अवलंब करावा म्हणजे मुद्रकाला चांगले दिवस येतील. पंढरपूरातील मुद्रकांनी मला खूप साथ दिली.मला म.मु.प.च्या अध्यक्षपदी निवड झाली ती पंढरपूरकरामुळेच त्यामुळे तुम्ही मुद्रकांनी मनात कुठलाही विचार न करता मला पंढरपूरला कधीही बोलवा मी त्यावेळेस अवश्य येईन.
त्यानंतर मा.अध्यक्ष पुना ओनर्स असोशिएनचे दाते म्हणाले की पंढरपूर सारख्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले त्याबद्दल मला खूप आनंद वाटला जसे मला पांडुरंगाचे बोलाविणे आले त्यातच कार्यक्रमाचा दिवस ही बुधवार होता, त्यामुळे मी या कार्यक्रमाला नाही हा शब्दच उच्चारू शकलो नाही. त्यातल्या त्यात कार्यक्रमात ज्येष्ठ मुद्रकांचा सत्कार होणार म्हटल्यावर मला खूप बरे वाटले, या कार्यक्रमात ते बोलताना म्हणाले की,या क्षेत्रात महिलांनी यावे महिला काम करताना एकाग्रपणे व सचोटीने काम करतात, महिला आता प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत आता मी समोर बघतोय महिलांची उपस्थिती थोडी कमी आहे, पुढच्या वेळेस मला बोलविले तर महिलांची लाईन पूर्ण भरली पाहिजे तरच मला आज बोलाविले त्यांचे समाधान होईल.
पंढरपूरचे लाडके ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांनी मुद्रकांच्या अडचणी सांगितल्या, कामगारांची समस्या खूप मोठी आहे. त्यासाठी आपण प्रत्येकांनी एकदोन कामगार तयार करावेत असे ते म्हणाले पंढरपूरात दैनिक चालविणे खूप मोठे आव्हान आहे. सचोटीने वृत्तपत्रिय व्यवसाय करणार्यास अनंत अडचणीस सामोरे जावे लागते असे ते म्हणाले. हा कार्यक्रम घेऊन पंढरपूर युवा मुद्रक संघाने नवीन पायंडा पाडल्याचे ते म्हणाले. आजपर्यत मुद्रक संघाचे अनेक कार्यक्रम झाले पण हा कार्यक्रम वेगळ्या प्रकारे साजरा करून आपले ‘युवा’ पण दाखविले.
यावेळेस गजानन बिडकर, मानसी मा.केसकर, कलावती शेंडगे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास सचिन उद्योग समुहाचे रमेश कोठारी, सुधाकर शेंडगे,उध्दव साळुंखे उपस्थित होते. प्रास्ताविक मंदार केसकर यांनी तर आभार प्रदर्शन रामकृष्ण बिडकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी,संजय यादव, प्रदीप भोरकर, सुरज कोठारी, रामकृष्ण बिडकर,श्रीनाथ साळुंखे, गजानन कौलगी, मकरंद वैद्य, मकरंद भाबुंरे, भास्कर रसाळ, श्रीराम रसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
