त्रैमासिक विवरणपत्राबाबत आवाहन पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत आवाहन… डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराबाबत आवाहन…

त्रैमासिक विवरणपत्राबाबत आवाहन पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत आवाहन… डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराबाबत आवाहन…

त्रैमासिक विवरणपत्राबाबत आवाहन
 
सोलापूर दि. 22 :  सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील नियोक्त्यांनी  त्रैमासिक विवरणपत्र ई आर-1  https ://www.maharoigar.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरुन सादर करावीत. ही विवरणपत्रे दिनांक 30 एप्रिल 2016  पूर्वी  सहायक संचालक जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पद्मशाली भवन, रविवार पेठ, कन्ना चौक, सोलापूर या कार्यालयाकडे  सादर करावीत. असे आवाहन सहायक संचालकांनी यांनी एका पत्रकान्वये केले आहे.
                                       0 0 0 0 
 
पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत आवाहन
 
  सोलापूर दि.22 :- सन 2016-17 या वर्षातील खरीप हंगामाकरीता पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यासाठी  प्रशासकीय मान्यता मिळाली असून या योजनेंतर्गत खरीप हंगामासाठी 2 टक्के, रब्बी  हंगामासाठी 1.5 तर नगदी पिकासाठी 5 टक्के इतका विमा हप्त्याचा दर शेतक-यांनी भरावयाचा असून या योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित शेतक-यांनी  राष्ट्रीयकृत बँकेकडे  अथवा जिल्हा मध्यवर्ती बँकेशी संपर्क साधावा. सन 2016-17  या वर्षातील पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामासाठी 31 जुलै तर रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर 2016 अखेरपर्यत  मुदत आहे.   

          या योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित शेतक-यांनी त्या-त्या तालुकाच्या कृषी अधिका-याशी अथवा उप विभागीय कृषी अधिका-याशी  संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले आहे.
                                                          0 0 0 0
 
                    डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्काराबाबत आवाहन

सोलापूर दि.22 – अनुसूचीत जाती-जमाती, भटक्या व विमुक्त जातीच्या कल्याणार्थ कार्य, शारीरिक व मानसिकदृष्टया मनोदुर्बल, वृध्द, अपंग, कुष्ठरोगी यांच्या उत्थानासाठी झटणा-या समाजसेवकांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून याच वर्षाकरीता डॉ.बाबासाहे आंबेडकर समाजउत्थान  पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.

                            यासाठी संबंधित अर्जदारांनी आपला प्रस्ताव 2 प्रतीत  दिनांक 28 एप्रिल 2016 पर्यंत सहायक आयुक्त समाजकल्याण डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सात रस्ता, सोलापूर (दूरध्वनी 0217-2734950) या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

                                                         0 0 0 0 

 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *