![]()
पावसाची हुलकावणी – वाढत्या उकाड्याने नागरिक हैराणसांगली –
गेल्या आठवड्यात तापमानाबरोबर वातावरणातील आर्द्रताही वाढली आहे. हवेत
सकाळपासून तीव्र उकाडा जाणवतो तसेच सायंकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊसही होतो.
आज पावसानेविश्रांती घेतली तरी सकाळपासूनच्या तीव्र उकाड्याने नागरिक हैराण झाले.
गेल्या आठवड्यात रविवार वगळता पारा ४१-४२ अंशांमध्ये राहिला आहे, तर किमान
तापमान २४-२६ अंशांच्या दरम्यान होते. याबरोबर आर्द्रतेचे प्रमाण
दिवसेंदिवस वाढत आहे. सकाळी ७० ते ८० टक्क्यांच्या दरम्यान आहे. सकाळी
सकाळीच घामाच्या धारा लागत आहेत. दुपारी तापमान वाढल्याने तीव्र उष्णतेला
तोंड द्यावे लागते. सायंकाळी पावसाळी वातावरण होते, कुठे जोरदार वारा सुटतो
आणि विजा चमकून पाऊसही पडतो. असे सारे वातावरण गेल्या सप्ताहात जाणवले.
आगामी सप्ताहातही असाच अनुभव पुन्हा येण्याची शक्यता आहे.
आज सकाळपासून
तीव्र उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. सकाळी साडेआठ वाजता वातवरणातील
आर्द्रता तब्बल ८१ टक्के होती. त्यामुळे उकाडा जाणवत होता. दुपारच्या
सुमारास तापमान ४१.३ अंशांवर गेले होते. त्यामुळे उष्णतेच्या झळांनी भाजून
काढले. त्यामुळे सायंकाळी पाऊस पडण्याची शक्यता
वाटत होती, मात्र पावसाने हुलकावणी दिली
