![]()
पंढरपूर : दि.26 ङ्गेब्रुवारी रोजी 24 ङ्गेब्रुवारीचा ‘जागतिक मुद्रण दिनाचे’ औचित्य साधून पंढरपूर युवक मुद्रक संघ,सचिन लग्नपत्रिका व महेश ऑङ्गसेट यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मुद्रक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले त्या प्रसंगी महाराष्ट्र मुद्रण परिषदेचे अध्यक्ष श्री.बाळासाहेब आंबेकर,टेक्नोव्हा कंपनीचे रिझनल मॅनेजर श्री.सतिश कुलकर्णी, सुप्रसिध्द करसल्लागार श्री.संजीवभाई कोठाडिया व सोलापूर येथील ज्येष्ठ मुद्रक सुजित देसाई, महेंद्र बाकळे, नंदकिशोर करवा, संदीप कन्ना, रूपेश कोंगारी, पंढरपूरातील ज्येष्ठ मुद्रक गजानन बीडकर, उध्दव साळुंखे, सुधाकर शेंडगे, श्रीमती मानसी केसकर, पंढरपूर युवा मुद्रक संघाचे अध्यक्ष श्री.दत्ताजीराव पाटील हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम दिपप्रज्वलन झाले याप्रसंगी पुणे,सोलापूर ङ्गरिदाबाद,टेक्नोव्हा,प्रकाश ऑङ्गसेट,क्लॉलिटी कॉम्प्युटर्स,अॅटोप्रिंट, नाईक अॅन्ड सन्स,अनुप पॉलिकेम, कलर रिको, सनशाईन सर्व्हिस,दर्शन पेपर्स, पिसे एन्टरप्रायझेस इ. कंपन्याच्या प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
त्यांनतर मान्यवरांचे सत्कार युवा मुद्रक संघाचे सदस्य सुरज कोठारी, संजय खासनीस, संजय यादव, श्रीनाथ साळुंखे, महेश हत्ते, प्रसाद बिडकर, मंदार केसकर, बबन सुरवसे, ज्येष्ठ मुद्रक रमेश घळसासी, प्रदीप भोेरकर, यांचे हस्ते झाले.
यावेळी गजानन बिडकर,मानसी केसकर, बाळासाहेब आंबेकर, संजीवभाई कोठाडिया, सतिश कुलकर्णी यांनी मुद्रकांना मार्गदर्शन केले.यावेळी बाळासाहेब आंबेकर म्हणाले की सर्व मुद्रकांनी एकत्रितपणे आपली दरनिश्चिती करावी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तङ्गावत ठेवू नये,व्यवसायात स्पर्धा जरूर करा पण दर इतके कमी करू नका की ज्यात आपले व आपल्याच मुद्रकांचे नुकसान होईल. त्यासाठी प्रत्येक मुद्रक संघानी आपले एक दरपत्रक अवश्य नजरेसमोर ठेवावे.
संजीव कोठाडिया यांनी सध्याच्या काळ हा ऑनलाईनचा असल्यामुळे प्रगत मुद्रण कलेबरोबर व्यवसायाचे प्रगत आर्थिक नियोजन करणेही तितकेच आवश्यक आहे. कर भरा म्हणजे तुम्ही आपोआप मोठे व्हाल असे सांगितले. तर व्यवसायात उत्कृष्ठ काम, वेळेचे नियोजन, व ग्राहकांशी संवाद साधला तर कितीही स्पर्धा असली तरी तुमचा ग्राहक कुठेही जाणार नाही. त्यासाठी आपल्या व्यवसायावर मनापासून श्रध्दा पाहिजे श्रध्दा असली म्हणजे तुम्ही अवश्य यशस्वी व्हाल असे सांगितले.सतिश कुलकर्णी यांनी मशिन मेटेन्सस व आपल्या ऑङ्गीस व वर्कशॉप मध्ये कशी सुरक्षितता पाळावी हे सांगितले.
या कार्यक्रमास संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील मुद्रक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक मनोगत,व सुत्रसंचालन युवा मुद्रक संघाचे सचिव मंदार केसकर यांनी केले. आभार प्रदर्शन प्रसाद बीडकर यांनी केले×
कार्यक्रम यशस्वी करण्यात श्रीराम रसाळ, वायचळ,संतोष गोंजारी,सुधाकर भोसले, मकरंद भांबुरे, वैभव शेंडगे,धनंजय उखळे, गजानन कौलगी व युवा मुद्रक संघाचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.

