मराठा आरक्षण विधेयक मांडण्याची मागणी…
9 May. 2017
पिंपरी, (प्रतिनिधी) – येत्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक मांडावे आणि बैलगाडा विधेयकाप्रमाणे मंजूर करून घ्यावे; अन्यथा आगामी लोकसभा व विधानसभा याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा ऍड. अप्पासाहेब शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
मागील वर्षी अवघ्या दोन महिन्यांत सर्वपक्षीय आमदारांनी विधानसभा व विधान परिषदेत विनाचर्चा बैलगाडा विधेयक एकमताने मंजूर केले. याउलट मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडून काही जण राजकीय सत्ता उपभोगत आहेत. मराठा तरुणांच्या पदरी याबाबत कायमच उपेक्षा पडली आहे. त्यामुळ शिक्षण व नोकरीत मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी ऍड. शिंदे यांनी मुख्यमंत्री; तसेच राज्यातील मराठा आमदारांकडे केली आहे. बैलगाडा शर्यत विधेयकाबाबत जशी तत्परता दाखवली, त्याच तत्परतेने मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित न ठेवता पावसाळी अधिवेशनात मांडावा, असे या पत्रकात नमूद केले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



