नवी दिल्ली-
भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरलेल्या आम आदमी पक्षाला आणि पक्षाचे निमंत्रण अरविंद केजरीवाल यांना आयकर विभागाने मोठा झटका दिला आहे. आम आदमी पक्षाला दोन कोटींची रक्कम देणगी स्वरुपात मिळाल्याचे आयकर विभागाला मान्य नाही. ते ‘आप’चे उत्पन्न आहे, असे आयकर विभागाने म्हटले असून, या प्रकरणी नोटीस बजावली आहे. त्यामुळे ‘आप’ला या दोन कोटींच्या रकमेवर कर भरावा लागणार आहे. तसे आदेशच आयकर विभागाने दिले आहेत. दरम्यान, आपला या दोन कोटींच्या रकमेचा हिशेब आयकर विभागाला देता आले नाही.
२०१५ मध्ये आम आदमी पक्षाला चार ड्राफ्टद्वारे ५०-५० लाख रुपयांची रक्कम मिळाली होती. ही रक्कम पक्षाला देणगीच्या स्वरुपात मिळाली होती, असे पक्षाचे म्हणणे आहे. मात्र, आयकर विभागाने आम आदमी पक्षाचा हा दावा फेटाळला आहे. आम आदमी पक्षाला मिळालेल्या देणग्यांमध्ये अनियमिततासंबंधी आयकर विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी देणग्यांचे स्रोत किंवा संबंधित कंपन्यांची नावे उघड करावीत, असे आयकर विभागाला सांगितले होते. मात्र, दोन कोटी रुपयांसंबंधी आम आदमी पक्ष समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे आम आदमी पक्षाला मिळालेले दोन कोटी रुपये देणगी नसून पक्षाची कमाई असल्याचे आयकर विभागाने सांगितले आहे. त्यामुळे या दोन कोटींच्या रकमेवर कर भरण्यात यावा, असे आदेश आयकर विभागाने केजरीवाल यांना दिले आहेत. दरम्यान, केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्याच एका कार्यकर्त्याकडून चार बोगस कंपन्यांच्या माध्यमातून ५०-५० लाख रूपये घेतले होते, असा आरोप एका संस्थेने यापूर्वीच केला होता.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



