👁 1 Views

पोलिसांचा ज्येष्ठ पत्रकारावर हल्ला……

पोलिसांचा ज्येष्ठ पत्रकारावर हल्ला……
10 May. 2017

(प्रतिनिधी):- नागपूर-कोरडी मार्गावर अतिक्रमण वाढले आहे. त्यासंदर्भात या मार्गावरील तवक्कल हाउसिंग सोसायटी येथे काल दुपारी २ वाजता अतिक्रमण विरोधी मोहीम सुरु होती. सदर कारवाईचे वृत्तांत करण्यासाठी जेष्ठ पत्रकार विनायक पुंड हे तेथे गेले होते. कारवाईचे वृत्तांत करीत असतांना पोलिसांनी त्यांच्यावर हल्ला केला. नंतर पोलिसांनी त्यांचा मोबाईल हिसकावून तोडला सुद्धा. सदर घटनेचा नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि टिळक पत्रकार संघ यांनी निषेध व्यक्त केला आहे. सदर घटनेसंबंधीचे निवेदन पोलीस आयुक्त के. व्यंकटेशन यांना देण्यात आले आहे. यावेळी दोन दिवसात संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार संघाने दिला आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *