हर्षवर्धन पाटील ः बावडा येथे साक्षी करेचा सत्कार
रेडा, दि. 11 (प्रतिनिधी) – वरकुटे बुद्रुकसारख्या ग्रामीण भागात शिकणारी एक मुलगी राज्य संघाचे नेतृत्व करत आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नुकतेच प्रतिपादन केले. महाराष्ट्र राज्य कुमार गट खो खो संघाची कर्णधार साक्षी करे हिचा बुधवारी (दि. 10) बावडा येथील रत्नाई निवासस्थानी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
साक्षी करे ही इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुकची रहिवाशी आहे. भारतीय खो खो महासंघ आणि महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या वतीने ही राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी साक्षी करे महाराष्ट्र राज्य संघाचे नेतृत्व करणार आहे. साक्षीला आगामी काळात सर्व सहकार्य केले जाईल, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. हर्षवर्धन पाटील यांनी तिला येत्या 24 ते 28 मे या कालावधीत नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या. यावेळी कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याचे संचालक आबासाहेब शिंगाडे, सुभाष काळे, सुरेश मेहेर, महादेव घाडगे, भाऊसाहेब करे, संदीप बल्लाळ, कैलास जाधव, अनिल जाधव आदी उपस्थित होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111



