मोडनिंब (ता. माढा) येथे विनापरवाना ६३ हजार रूपयांचा अवैध दारूसाठा जमा करून ठेवल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी व इतर दोन जणांविरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेंभुर्णी पोलीस ठाणे हद्दीतील मोडनिंब गावातील करकंबकडे जाणाऱ्या रस्त्यावरील महेश इलेक्ट्रीकल्समध्ये उमेश गणपत तोडकरी व कैलास कमलाकर तोडकरी (दोघे रा. मोडनिंब ता. माढा) यांनी विक्रीसाठी अवैधरित्या साठा करून ठेवलेल्या ५३ हजार ४६० रूपये किंमतीचा विदेशी व बिअरच्या बाटल्या जप्त करून त्यांना ताब्यात घेतले. तसेच शेजारीच असलेल्या संकेत बिअर शॉपीत विदेशी दारू विक्रीचा परवाना नसतानाही दादासाहेब बाळासाहेब पाटील (रा. नेहरू नगर मोडनिंब) याने विक्रीसाठी ठेवलेल्या ९ हजार ७७० रूपये किंमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. दोन्ही कारवाईमध्ये एकूण ६३ हजार २३० रूपये किंमतीची अवैध दारूसाठा जप्त करून तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




