13 मे : एके काळी मुंबईचा डॉन राहिलेल्या हाजी मस्तानच्या मुलाने सुपरस्टार रजनीकांतला धमकी दिलीये. हाजी मस्तानची नकारात्मक भूमिका दाखवली तर सोडणार असा सज्जड दमच त्याने रजनीकांतला भरलाय.
त्याचं झालं असं की, हाजी मस्तानावर सुपरस्टार रजनीकांतचा ‘गाॅडफादर’ हा चित्रपट येतोय. त्यामुळे हाजी मस्तानचा मुलगा सुंदर शेखरने या चित्रपटावरुन थेट द बाॅस रजनीकांतला धमकीच दिलीये.
“हाजी मस्तानच्या जीवनावर चित्रपट बनवण्यात येत आहे. हे ठीक आहे. जर हाजी मस्तानला नकारात्मक भूमिकेत दाखवलं तर रजनीकांतला सोडणार नाही असा इशारा त्याने दिलाय.
तसंच तुम्ही हाजी मस्तानवर ‘गॉडफादर’ हा चित्रपट बनवताय. पण चित्रपटात त्याची नकारात्मक भूमिका दाखवू नका. हाजी मस्तानला लोक अंडरवर्ल्ड डॉन आणि तस्कर म्हणून ओळखत होते. पण हाजी मस्तानला न्यायलयाने दोषी ठरवलं नाही. आणि त्याचा एक राजकीय पक्ष आजही अस्तित्वात आहे त्यामुळे हाजी मस्तानच्या जीवनावर चांगला चित्रपट बनवा असा सल्लाही त्याने रजनीकांतला दिला.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111




