👁 9 Views

भुजबळांना तुरुंगात मिळते चिकन मसाला, दारू: अंजली दमानियांची तक्रार

महाराष्ट्र सदन आणि इतर आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना कारागृहात ‘व्हीआयपी’ ट्रीटमेंट मिळत असल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजनी दमानिया यांनी केला आहे. आर्थर रोड तुरुंगाच्या अतिरिक्त कारागृह अधीक्षकांना पत्राद्वारे दमानिया यांनी ही तक्रार केली आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कारागृहाच्या अतिरिक्त अधीक्षकांना आपण पत्र लिहून तक्रार केल्याचे म्हटले आहे. त्यांनी केलेल्या आरोपांनुसार, छगन भुजबळ यांना कारागृहात टीव्ही उपलब्ध करून देण्यात आला आहे. भुजबळ कारागृहात हिंदी चित्रपट पाहत आपले मनोरंजन करत असतात. भुजबळांना चमचमीत खायलाप्यायला मिळत असून त्यांना त्यांची आवडती डिश चिकन मसालाही उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबरोबर त्यांना दर दोन तासांनी फळेही दिली जातात. इतकेच नव्हे तर त्यांना कारागृहात दारु देखील उपलब्ध करून दिली जाते.

‘समीर भुजबळ यांनाही मिळते दारू’

छगन भुजबळ यांचा पुतण्या आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनाही वडिलांप्रमाणेच व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. समीर भुजबळ यांना इतर सुविधांबरोबर नारळातून व्होडकाही दिली जात असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. समीर यांच्यासाठी खासगी बोलण्याची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. ही माहिती आपल्याला कारागृहातील कर्मचाऱ्याने दिली असल्याची माहिती दमानिया यांनी दिली आहे. याबाबत आपण कारागृहाच्या अतिरिक्त अधीक्षकांना फोनद्वारे ही माहिती दिली. त्यांना एसएमएसदेखील पाठवले अशी माहितीही दमानिया यांनी दिली.

आपण दिलेल्या आधीच्या तक्रारींवर आपण काय कारवाई केली याबाबत अतिरिक्त अधीक्षकांनी आपल्याला माहिती दिली आणि आताच्या तक्रारीचे प्रकरण कारवाई आपण पुढे पाठवले असल्याचे असल्याचे अतिरिक्त अधीक्षकांनी आपल्याला सांगितले असल्याचेही दमानिया म्हणाल्या.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *