👁 7 Views

आव्हे येथे राष्ट्रिय भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमाअंतर्गत चावडीवाचन

करकंब:- आव्हे ता पंढरपुर येथे आज दि 17 रोजी तहसिलदार अनिल कारंडे यांच्या आदेशाने सरपंच पिंटू जगन्नाथ करवर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयामध्ये संगणीकृत 7/12 चे चावडीवाचन करण्यात आले.
यावेळी गावकामगार तलाठी तलाठी एस बी कांबळे यांनी 7/12 चे चावडीवाचन केले.मूळ हस्तलिखित सात बारा बरोबर संगणीकृत सात बारा तंतोतंत जुळणे आवश्यक आहे.महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख नोंदवह्या नियम 1971 मधील नियम 6 व 7 प्रमाणे गाव नमूना नंबर 7/12 व 8/अ तयार करण्यासाठी चावडी वाचनाची विशेष मोहीम राबवण्याबाबत महसुल प्रशासनाने सूचना दिल्या आहेत.
यावेळी चावडी वाचन करून खातेदारांनी सुचविलेल्या दुरुसत्यासह ऑनलाइन तपासणीची कार्यवाही पूर्ण करून तपासणी गावकामगार तलाठी यांनी पूर्ण करावयाची आहे.उतारयावर आढळून आलेल्या चूका हिरव्या शाइने दुरुस्त करण्यात व चावडी वाचनावळी दुरुस्त केलेली उतारयाची प्रिंट खातेदारांना तपासनीसाठी देऊन निदर्शनास आणलेल्या चूका पुन्हा लाल शाइने दुरुस्त करण्यात येणार आहेत.यावेळी खातेदार यांची नोंदवही मध्ये नोंद घेऊन स्वाक्षरी घेण्यात येणार आहे.आव्हे येथे एकूण 935 7/12 उतारे आहेत.
यावेळी महसुल मंडल अधिकारी एस एम् क़ाझी, प्रगतशील बागायतदार नवनाथ जगताप,तंटामुक्ति अध्यक्ष भीकू ननवरे,कॉंग्रेस तालुका अध्यक्ष गणेश ननवरे,अंगतराव पिंजारी,मुकींदा खताळ,ग्रामपंचायत सदस्य विलास कांबळे,रघुनाथ जगताप,पोपट पाटिल,गणेश पाटिल,संदीपान यमगर,पांडुरंग ढोले,अशोक यमगर,दत्तात्रय बनसोडे,दत्तात्रय नाईकनवरे,पोलिस पाटिल कांतिलाल गडदे आदि सह शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *