दी हेग (नेदरलँडस्), दि. 18 – हेरगिरी आणि विघातक कारवायांच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली आहे. भारताने केलेल्या याचिकेवर नेदरलँड्समधील दी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी आपला निकाल सुनावला. अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देता येणार नाही असं आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्पष्ट केलं असून यामुळे पाकिस्तानला चांगलाच दणका बसला असून भारताला दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयातील निकाल कुलभूषण जाधव यांच्या बाजूनं लागावा यासाठी मुंबईसह राज्यभरात पूजा-अर्चना, हवन, यज्ञ करण्यात आली.
सांगलीतील राम मंदिरासमोर भाजपाच्या वतीने कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी आरती करण्यात आली.
यापूर्वी मुरादाबादमध्येही कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या सदस्य व स्थानिकांनी मंदिरात यज्ञ तसंच हवन करुन जाधव यांच्या सुटकेसाठी प्रार्थना केली होती
अयोध्येमध्येही कुलभूषण जाधव यांच्या सुरक्षा व दीर्घायुसाठी शनिधाम पीठाधीश्वर स्वीमा हरिदयाल मिश्र यांच्यासहीत 5 पंडितांद्वारे हवन करण्यात आले.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111








