👁 8 Views

तुरूंगातही आमदार रमेश कदमांची मुजोरी कायम

मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या घोटाळ्यात सध्या तुरूंगात असणाऱ्या असूनही आमदार रमेश कदम यांची मुजोरी अजूनही कमी झालेली दिसत नाही. कारण रमेश कदम यांनी तुरूंगामध्ये पोलिसांवर दादागिरी करत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असल्याचे समोर येत आहे.
रुटीन चेकअपसाठी रमेश कदम यांना मुंबईतील जे.जे.रुग्णालयात नेले जात होते. मात्र कदम रुग्णालयात जाण्यास तयार नव्हते. यावेळी पोलिसांनी व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिस अधिकाऱ्याने रमेश कदम यांचं म्हणणं लिहून घेण्यास सांगितले. त्यानंतर रमेश कदम यांनी पोलिसांवर दादागिरी करत शिवीगाळ केली. इतकेच नाही तर पोलिसांना धमकीही दिली. दरम्यान, अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्याप्रकरणी आमदार रमेश कदम अटकेत आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *