नवी दिल्ली – सीबीआयच्या विशेष कोर्टाने कोळसा घोटाळा प्रकरणात माजी कोळसा सचिवांसह 3 जणांना दोषी ठरवले आहे. विशेस सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश भरत पराशर यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. यात माजी कोळसा कोल सेक्रेटरी एच.सी. गुप्ता, कोळसा मंत्रालयाचे माजी संयुक्त सचिव के.एस. क्रोफा आणि माजी संचालक के.सी. सामरिया यांचा समावेश आहे. या तिघांना 22 मे रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
कंपनी आणि व्यवस्थापकीय संचालक सुद्धा दोषी
– मध्यप्रदेशातील थेसगोरा-बी रूद्रपूरी कोल ब्लॉक KSSPL प्राइवेट कंपनीला वाटताना नियम मोडल्याचे आरोप आहेत. कोर्टाने या अधिकाऱ्यांसह KSSPL कंपनी आणि कंपनीचे एमडी पवन कुमार अहलुवालिया यांनाही दोषी ठरवले आहे. तर दुसरीकडे, चार्टर्ड अकाउंटन्ट अमित गोयल याला दोषमुक्त करण्यात आले आहे.
– कोळसा घोटाळा उघडकीस आला, त्यावेळी क्रोफा कोळसा मंत्रालयात संयुक्त सचिव होते. तर, सामरिया त्यावेळी मंत्रालयात कोल ब्लॉक वाटण्यासाठी नेमलेले संचालक होते.
यूपीएच्या काळात 2 वर्षे कोल सचिव होते गुप्ता
– विशेष न्यायालयाने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात या प्रकरणी आरोप निश्चित केले होते. तसेच कोळसा सचिवांनी या व्यवहारांची माहिती तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना दिली नव्हती असेही स्पष्ट केले होते. गुप्ता यांनी कोळसा खाण वाटप करताना केवळ कायदाच नव्हे, तर विश्वास देखील मोडला असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. गुप्ता यांच्या विरुद्ध वेग-वेगळे 8 आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टाने नुकतीच सर्व प्रकरणांची संयुक्त सुनावणी घेण्याचे अपील फेटाळून लावले आहे.
– 2008 मध्ये निवृत्त होण्यापूर्वी गुप्त काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएच्या राजवटीत 2 वर्षे कोळसा सचिव होते. त्यांनी कोळसा उत्खननाच्या 40 प्रकरणांना मंजुरी देणाऱ्या स्क्रीनिंग समितीचे अध्यक्ष पद सुद्धा भूषविले होते.
मनमोहन सिंग यांनी दिली मंजुरी -गुप्ता
– गतवर्षी सीबीआय कोर्टाच्या बाहेर पडत असताना सर्व आपण जामीनाचा खर्च उचलू शकत नाही, त्यामुळे तुरुंगातच राहून कायदेशीर लढा देणार असे म्हटले होते. यासोबतच सर्व कोळसा खाण वाटपांच्या फायलींना शेवटची मंजुरी कथितरीत्या तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिल्याचे आरोप करून गुप्ता चर्चेत आले होते.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





