पुणे : पुण्याच्या किशोर धनकुडेंनी जगातल्या सर्वात उंच अशा एव्हरेस्टवर दुसऱ्यांदा यशस्वी चढाई केली आहे. त्यांनी दोन्ही बाजुंनी एव्हरेस्ट सर केला असून असे करणारे ते महाराष्ट्रातील पहिलेच गिर्यारोहक आहेत.
किशोर धनकुडे यांची चढाई काल सकाळी साडेसहा वाजता पूर्ण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. ते व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर आहेत. महाविद्यालयात असतानाच त्यांनी ट्रेकिंगची आवड जोपासली होती. गेल्या सात वर्षांपासून ते गिर्यारोहण करतात. 2014 साली त्यांनी पहिल्यांदा उत्तर दिशेने म्हणजे चिनच्या दिशेने एव्हरेस्ट शिखर सर केले होते. तर आता त्यांनी दक्षिणेकडून म्हणेज नेपाळमधून एव्हरेस्ट सर केले आहे. दरम्यान, त्यांनी केलेल्या या विक्रमाबद्दल त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





