👁 9 Views

चित्रपट दिग्दर्शक राजेश नंदा यांचा वृद्धाश्रमात करूण अंत..

पंढरपूर लाईव्ह
प्रतिनिधी: सचिन व्हटे

पुणे – ज्येष्ठ चित्रपट निर्माते राजेश नंदा यांचे शनिवार ( २० मे) रात्री आठच्या सुमारास आकुर्डी येथील वृद्धाश्रमात निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून नंदा यांचा त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. त्यांच्या निधनाची बातमी नातेवाईकांना कळवली. मात्र, कोणीही त्यांच्या अंत्यसंस्काराला येण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे वृद्धाश्रमाच्या कर्मचाऱ्यांनीच त्यांच्यावर अंत्यविधी केला.
राजेश नंदा यांनी १९६९ मध्ये नतीजा हा हिंदी चित्रपट दिग्दर्शित केला. ज्यात विनोद खन्ना, जुनियर मेहमूद, बिंदु यांनी काम केले होते. तर १९७१ मध्ये दिग्दर्शित केलेल्या बेहरुपिया हा चित्रपटात हेलन, धीरज कुमार यांनी काम केले होते. याबरोबरच त्यांनी १९६२ पीक पॉकेट तर १९६५ साली संत तुकाराम या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
राजेश नंदा यांना वर्षभरापूर्वी प्रसिद्ध गझलकार अशोक खोसला यांनी आकुर्डी येथील संत बाबा मोनी साहेब वृद्ध आनंदाश्रम येथे आणले. अशोक खोसला हे वृद्धाश्रमाचे संचालक आहेत. याविषयी खोसला यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, मला प्रसिद्ध कवी सुधीर शर्मा यांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितले की दिग्दर्शक नंदा हे एका रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. मात्र, त्यांचे कोणी नातेवाईक त्यांच्याजवळ नाही तसेच त्यांना ते सांभाळत नाहीत. यावेळी त्यांच्या नातेवाईकांशी आम्ही संपर्क साधला. मात्र, तो होऊ शकला नाही. तर एकाने त्यांना ओळखण्यास नकार दिला. त्यानंतर मी त्यांना आकुर्डी येथे घेऊन आलो आणि शेवटपर्यंत त्यांची काळजी घेतली.
यावेळी सुधाकर शर्मा यांच्याशीही संपर्क साधला. यावेळी त्यांनीही आम्ही त्यांना १५ वर्षापासून सांभाळत होतो. मात्र, त्यांचे कोणी नातेवाईक आम्हाला भेटले नाहीत. नंदा यांनीही कधी आम्हाला काही सांगितले नाही. त्यानंतर आम्ही त्यांना खोसला यांच्याकडे पाठवले.
नंदा यांची मोजकीच माहिती वृद्धाश्रमाकडे आहे. ते फक्त एक भाऊ आणि भाच्चीने माझी सर्व संपत्ती लुटली, असे बोलताना सांगत. त्यांचे शनिवारी निधन झाले. त्यावेळीही नातेवाईकांशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी यावेळीही त्यांनी हातवर केले. त्यानंतर वृद्धाश्रम प्रशासनाने नंदा यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *