👁 9 Views

अथक प्रयत्न करणार्‍याला यश प्राप्त होते

-नूतन पी.एस.आय. सुनील रणदिवे

अनवली विकास प्रतिष्ठान आयोजित गौरव गुणवंताचा’ सन्मान सोहळा सन २०१७ संपन्न

 अनवलीमध्ये अनवली विकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत नवनिर्वाचित पी.एस.आय. सुनील रणदिवेपी.एस.आय पाटणे, राष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू अभिजित गांजाळे आणि कनिष्ठ अभियंता जलसंपदा विभाग शिशिर गांजाळे या गुणवंताचा सत्कार व कौतुक सोहळा पार पडला. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना नूतन पीएसआय. सुनील रणदिवे सोबत मान्यवर   

पंढरपूर– अनवली (ता. पंढरपूर) येथील अनवली विकास प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेमार्फत नवनिर्वाचित पी.एस.आय. सुनील रणदिवेपी.एस.आय पाटणे, राष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू अभिजित गांजाळे आणि कनिष्ठ अभियंता जलसंपदा विभाग शिशिर गांजाळे या गुणवंताचा सत्कार व कौतुक सोहळा पार पडला.
              प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक वल्लभ बारले यांनी केले. त्यामध्ये त्यांनी अनवली विकास प्रतिष्ठानची स्थापना ही समाज प्रबोधन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनरक्तदान शिबीर, वृक्षारोपण व त्यांचे संवर्धन,अंधश्रद्धा निर्मुलन, ग्राम-स्वछता अभियान इत्यादी हेतूसाठी झालेली आहे’ असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतामध्ये अमरजित पाटील यांनी जगातील वास्तव काय आहे ?’ याच्यावर प्रकाश टाकला तसेच त्यांनी युवकांना उद्देशून मार्गदर्शन केले. त्यानंतर अनवली विकास प्रतिष्ठानचे सदस्य औदुंबर डीसले यांनी गुणवंताचे कौतुक केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेछा दिल्या. त्यानंतर महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षकपदी विराजमान झालेले सुनील रणदिवे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातअभ्यास करीत असताना आलेल्या अडचणीवर कशी मात केली?’ हे सांगून गावातील तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, “कोणतेही कार्य अडथळयावाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जो प्रयत्न करीत राहतो त्यांनाच यश प्राप्त होते”. सर्वप्रथम या यशामध्ये त्यांनी आई-वडिलांचे कष्ट व परिश्रम हीच आपल्यासाठी खरी प्रेरणा मिळाल्याचेसांगितले तसेच त्यांना अडचणीच्या काळात मदत करणारे त्यांचे मित्र मंडळी यांचेही त्यांनी आभार मानले. तसेच त्यांचे मार्गदर्शक पोलिस निरीक्षक साईनाथ माळीपोलिस हवालदार तानाजी पवारसंदीप डागळेराजेश पाटील व विजय जगताप यांचेही त्यांनी आवर्जून आभार मानले. तसेच राष्ट्रीय धनुर्विद्या खेळाडू अभिजित गांजाळे आणि कनिष्ठ अभियंता जलसंपदा विभाग शिशिर गांजाळे या गुणवंताचेही कौतुक केले. सर्वात शेवटी गावातील तरुण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून गावाच्या विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
           त्यानंतर दुसरे सत्कारमूर्ती अभिजित गांजाळे हा इयत्ता आठवीत शिकतोय हा १४ वर्षाचा धनुर्धारी प्रतिकूल परस्थितीवर मात करीत आपल्या डाव्या हाताने धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात राज्य स्तरावर ३ सिल्वर,१ कांस्य व एक गोल्ड मेडल पटकावले आहे. अभिजितचे ऑलंम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी त्याला कोरियन रिकर्व धनुश्यबाणाची आवश्यकता आहे. ज्याची किंमत २.५० लाख इतकी आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनवली विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष वल्लभ बारले व सचिव अमोल माळी यांचेकडून त्यांना एकवीस हजार रुपयांचा धनादेश देवून गौरवण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बी.के ग्रुप व अनवली विकास प्रतिष्ठानचे सदस्यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासाठी  अनवलीतील उपसरपंच चांगदेव घोडके, मुख्याद्यापक शिवशरणसंजय पाटील,औदुंबर डिसले,मनसुब शेख,संजय माळीबबन पाटील, बिरुदेव कोकरे, तोफिक शेख,रावसाहेब घोडके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश बारले यांनी केले तर  प्रकाश भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *