मुंबई | मराठा क्रांती मोर्चाचं शमलेलं वादळ पुन्हा एकदा घोंघवणार आहे. येत्या क्रांती दिनी म्हणजेच 9 ऑगस्टला मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा काढण्यात येईल. शिवप्रहार संघटनेचे प्रमुख संजीव भोर यांनी ही माहिती दिलीय.
मोर्चा व्यवस्थापनाची रणनीती १३ जुलैला कोपर्डीत होणाऱ्या बैठकीत ठरवण्यात येणार आहे. तर १ जून रोजी होणाऱ्या शेतकरी संपाला मराठा म्हणून सहभागी होऊ, असं संजीव भोर यांनी म्हटलंय.




