सुदैवानं जास्त उंचीवर नसल्यानं मोठा अपघात टळला.
लातुर: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बालंबाल बचावले, लातुरात मुख्यमंत्री फडणवीस यांचंउड्डाण घेत असताना, हेलिकॉप्टर हेलिपॅडवरच कोसळलं, या अपघातात मुख्यमंत्री सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या उजव्या हाताला खरचटलं आहे.
या हेलिकॉप्टरचे पंख जागीच निखळले आहेत, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधून मोठा धूर निघतोय. जवळ पोलिसांचा मोठा फौजफाटा जमा झाला आहे. बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी आपण आणि आपली टीम सुरक्षित असल्याचं ट्ववीट केलं आहे.
जवळचं १०० मीटरवर एक ट्रान्सफॉर्मर देखील आहे. महाराष्ट्र शासनाचं हे हेलिकॉप्टर असल्याचं सांगण्यात येत आहे. हे हेलिकॉप्टर २२ वर्ष जुनं असून हे यूपीकडून विकत घेतलं असल्याचं सांगण्यात येत आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111








