करड्या शिस्तीचे प्रशासकीय अधिकारी अशी प्रतिमा असलेल्या तुकाराम मुंढे यांनी पंढरपूरमधील केलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. कारण तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळातील कामे निकृष्ट दर्जाची झाली असून 65 एकर मध्ये केलेल्या कामाची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली. सोलापूरचे जिल्हाधिकारी असताना आषाढी यात्रा काळात वारकऱ्यांना राहण्यासाठी ज्या पासष्ट एकरात तुकाराम मुंढे यांनी विकासकामे केली होती. त्या कामामुळेच त्यांची राज्यभर वाहवा झाली होती मात्र, आता त्याच कामाबाबत खुद्द विभागीय आयुक्तांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यामुळे आता मुंढेंवर काय कारवाई होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Posted inPandharpur Live News





