👁 11 Views

संस्था टिकविणे ही काळाची गरज- आ. परिचारक


वाखरी, प्रतिनिधी
पश्‍चिम महाराष्ट्र हा सहकारी संस्थेचा बाल्ले किल्ला आहे. सहकारी संस्थेचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. कोणतीही संस्था काढणे सोपी आहे पण ती टिकविणे अवघड आहे. त्यासाठी आहे. त्या संस्था टिकविणे काळाची गरज आसल्याचे विधान परिषदेचे आ. प्रशांत परिचारक यांनी म्हटले आहे. ते श्री पंतकृपा ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या वाखरीच्या स्नेह मेळावा व सोने तारण, कर्ज सुविधा शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक निबंधक पी.टी.घुगे हे उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. प्रशांत परिचारक म्हणाले की, बँक असो व पतसंस्था असो या ठिकाणी सोने तारण सुविधा संस्थेच्या दृष्टीने फायदेशीर आहे. त्या दृष्टीने पतसंस्थेने वाटचाल करणे गरजेचे आहे. माजी आ. सुधाकरपंत परिचारक यांच्या नावाने पंतकृपा पतसंस्थेची निर्मिती केली आहे. ही संस्था चांगल्या प्रकारे चालत आहे. चेअरमन व संचालक मंडळाचे यावेळी त्यांनी अभिनंदन केले.
सहाय्यक निबंधक पी.टी.घुगे म्हणाले की, सहकारी पतसंस्था सध्या आडचणीतून जात आहे. परंतु पंतकृपा पतसंस्था चांगल्या प्रकारे चालु आहे. भविष्यात या संस्थेचे मोठे जाळे तयार होईल. संस्थेच्या प्रगती बरोबरच सामाजिक बांधिलकी जपल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जि.प.सदस्य सविता गोसावी, पं.स.सदस्या पल्लवी यलमार, पंतकृापा पतसंस्थेच्या संचालकपदी गणेश बागला यांची निवड झाल्याबद्दल, वाखरी आश्रम  शाळेच्या प्राचार्या शमशाद बागवान, बिंटु मेटकरी व जि.प.शाळा वाखरी यास आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आले.


यावेळी गंगाधर विभुते, विष्णुभाऊ बागल, संगिता पोरे, गणेश बागल, भाऊसाहेब शिंदे, सुदर्शन कांवळे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन गुलाबराव पोरे यांनी केले. तर आभार व्हा. चेअरमन नागनाथ गोरे यांनी मानले. सूत्रसंचान स्वाती आराध्ये यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे व्यवस्थापक सुनिल तवटे व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी चंद्रकांत मस्के, रामा पांढरे, बाळासाहेब लेंगरे, लहून ढाळे, धनंजय पोरे, वाखरी ग्रामस्थ, संस्थेचे संचालक, सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *