जलयुक्त शिवारच्या कामासंदर्भात लाच मागितल्याप्रकरणी माळशिरस तालुक्यातील फडतरी गावच्या सरपंचाला अटक करण्यात आली आहे. इदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथिल तक्रारदाराच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे. जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मौजे फडतरी येथील गुप्तलिंग तळ्याातील गाळ काढण्यासाठी तक्रारदाराने आपल्या जेसीबी मशिन दिल्या होत्या. मशिनच्या भाड्याच्या बदल्यात तलावातील वाळू तक्रारदारास देण्याचे ग्रामपंचायतीने ठरविले होते. त्याबद्दल ग्रामपंचायतीने ठरावही केला होता. परंतूफडतरीचे सरपंच विनोद रुपनवर यांनी तक्रारदाराकडे 25 हजार रूपयांची लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड अंती 20 हजार रुपयांवर तडजोड झाली. दरम्यान खासगी इसमामार्फत रुपनवर यांनी लाचेची रक्कम स्वताच्या हॉटेल कृष्णाई मध्ये सागर गुळीमच्या मार्फत स्विकारली असता त्यांना रंगे हाथ पकडण्यात आले. ही कारवाई पोलिस उपअधिक्षक अरुण देवकर व नातेपुते पोलिस निरक्षक श्री. साळुंखे यांच्या टिमने कारवाई केल
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!