सचिन व्हटे, पंढरपूर लाईव्ह,
सांगोला /प्रतिनिधी : – सांगोला तालुक्यातील नाझरा येथे माता रमाई स्मृती दिनानिमित्त भिमराज प्रतिष्ठान नाझरा यांच्याकडुन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी प्रतिमेचे पुजन वैशाली ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिपप्रज्वलन स्वाती नवघरे, दिक्षा ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती सांगोला ता.आरपीआय संपर्क प्रमुख सुरेंद्रजी ढोबळे, आठवले युवा मंच नाझराचे अध्यक्ष गणेश ढोबळे तसेच संजु ढोबळे, नागेश वाघमारे, नवनाथ ढोबले, सागर नवघरे, अजय चंदनशिवे बंटी काटे, योगेश ढोबले, प्रणय कांबळे, असे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भिमराज प्रतिष्ठान नाझराचे अध्यक्ष भिमराज ढोबळे यांनी केले तर आभार संजु ढोबळे यांनी केले.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





