– तब्बल चार कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स
– डोनाल्ड ट्रम्पना टाकले मागे
नवी दिल्ली, २७ मे
लोकप्रिय सोशल मीडिया साईट असलेल्या फेसबुकवर चार कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्ससह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते ठरले आहेत. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेसबुकवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले राजकीय नेते ठरले आहेत. या चार कोटी फॉलोअर्समध्ये मोदी यांच्या पेजला तीन कोटी, तर पंतप्रधान कार्यालयाच्या पेजला एक कोटी फॉलोअर्स आहेत.
मे २०१४ मध्ये मोदींनी पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतली त्यावेळी त्यांच्या पेजला केवळ ४० लाख फॉलोअर्स होते. तीन वर्षांमध्ये हा आकडा चार कोटींवर जाऊन पोहोचला आहे. फॉलोअर्सच्या बाबतीत मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे टाकले आहे. मोदी यांच्या डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत या योजना सोशल मीडियावर लोकप्रिय ठरल्या आहेत. सार्वजनिक प्रशासनात सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्याची ही नवीन पद्धत आहे, अशी प्रतिक्रिया फेसबुकचे भारतातील संचालक अंखी दास यांनी व्यक्त केली आहे.
मोदी यांच्यानंतर भारतात सर्वाधिक फॉलो केले जाणार्या नेत्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, जनरल व्ही. के सिंह, पीयूष गोयल आणि अरुण जेटली यांचा समावेश आहे. केंद्रीय महिती व प्रसारण मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, रेल्वे मंत्रालय यांच्याकडून फेसबुकद्वारे लोकांशी संवाद साधून, फेसबुक लाईव्हच्या सेवेचा वापर करून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. त्यास प्रतिसादही चांगला मिळत आहे.
दास यांच्या सांगण्यानुसार, फेसबुकद्वारे मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या मंत्रालयातील अधिकारी व कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत जवळपास सहा हजार सरकारी कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
Posted inMaharashtra





