👁 10 Views

मालकी हक्‍काच्या जागेत अतिक्रमण करणाऱ्या सात जणांना अटक

पुणे, (प्रतिनिधी) – मालकी हक्काच्या जागेत अतिक्रमण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिसांनी सात जणांना अटक केली असून आणखी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हि घटना बाणेर येथे शनिवारी सकाळी 11 वाजता घडली. ऋषीकेश अशोक बारटक्के ( वय 32, ऋतुजा पार्क, बाणेर), प्रविण भगवान वनशिव ( वय 27, रा. कामठेवस्ती, धायरी गाव ), नितेश अशोक चवरे ( वय 29, रा. आंबेगाव, खुर्द), तुषार हनुमंत भंडलकर ( वय 23, किरकटवाडी, सिंहगड रोड ), अमोल सिध्दप्पा बेळमघे ( वय 23, रा. बोराटे वस्ती, वारजे), मकरंद राहुल धोंडे-पाटील ( वय 26, रा.धायरी गाव), अमोल मारुती कांबळे ( वय 19, रा. किरकटवाडी, सिंहगड रोड) यांना अटक करण्यात आले आहे. फिर्यादी नितीन शहा ( वय 51, रा. पाषाण) यांची बाणरे येथे मालकी हक्काची व वहिवाटीची जमिन आहे. त्यांनी जागेला तारेचे कंपाऊंड करुन त्यालगत विटा-सिमेंटचे बांधकाम केले आहे. हे
बांधकाम लोखंडी अँगलसह जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. यामुळे फिर्यादीचे सुमारे चार लाखाचे नुकसान झाले. तसेच जागा मालकांना शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दहशत पसरवण्यासाठी हे आरोपी हातात लाकडी दांडके घेऊन आले होते. पोलिसांनी यासंदर्भात सांगितले की, आरोपी ऋषीकेश बारटक्के हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर कोंढवा येथे एक गुन्हा दाखल आहे. त्याने या जागेसंदर्भात मुळ मालकाशी एमओयू करार केला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रमोद क्षिरसागर तपास करत आहेत.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *