👁 7 Views

एकाच वेळी 4 नवजात बालकांचा मृत्यू…डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालयात घटना

अमरावती, दि. 29 – अमरावतीतील पंजाबराव देशमुख रुग्णालयात एकाच वेळी 4 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चारही नवजात मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण अद्याप समोर येऊ शकलेले नाही.  
 
‘एबीपी माझा’नं दिलेल्या वृत्तानुसार, एकाच वेळी चार नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानं त्यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांविरोधात संताप व्यक्त केला. शिवाय, डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणीही केली आहे. रविवारी (28 मे) ही घटना घडली आहे.
 
पंजाबराव देशमुख रुग्णालयात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून लोक उपचारासाठी येत असतात. या चारही बालकांच्या मृत्यूने एकच खळबळ माजली आहे.  
 
याप्रकरणी आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस आणि रुग्णालयातील एक टीम या प्रकाराची चौकशी करणार आहे. त्यामुळे चौकशीनंतरच या बालकांच्या मृत्यूचं नेमकं कारण समजू शकेल.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *