👁 10 Views

प्रवाशांनी एस.टी. प्रवासास प्राधान्य द्यावे – नगराध्यक्षा साधना भोसले

पंढरपूर दि.01 :- एस.टी.चा प्रवास हा सुरक्षित प्रवास असून प्रवाशांनी एस.टी. बसनेच प्रवास करण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केले.
 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 69 वर्षे पुर्ण झाल्याने पंढरपूर आगारामध्ये वर्धापन दिन साजरा करण्यात यावेळी प्रवासी महासंघाचे महासचिव प्र.वि.कुलकर्णी, ग्राहक मंचाचे शशिकांत भोसले, आगार व्यवस्थापक मुकूंद दळवी, पालक अधिकारी हरीभाऊ सांळुखे आदी उपस्थित होते.
एस.टी.महामंडळाची बस शहराबरोबरच ग्रामीण भागातही चांगली सेवा देत आहे. महामंडळाने प्रवाशांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत.  महामंडळाने ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी एस.टीच्या फेऱ्या वाढवाव्यात असे आवाहन ही त्यांनी केले. महामंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त नगराध्यक्षा श्रीमती भोसले यांनी महामंडळाची सर्व अधिकारी- कर्मचारी आणि प्रवाशांना यावेळी शुभेच्छा दिल्या.
 पालक अधिकारी हीरभाऊ सांळुखे यांनी एस.टी. महामंडळाकडून  प्रवाशांना देण्यात येणा-या सुविधांची व परिवहन महामंडाळाची कार्याची माहिती  दिली.  दर्शन बसने  पंढरपूर आगाराला 8 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. यावेळी महामंडाळाच्यावतीने प्रवाशांना गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला. तसेच 31 मे 2017 रोजी पंढरपूर आगारातील 14 सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पंढरपूर आगारातील  अधिकारी कर्मचारी तसेच प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *