👁 11 Views

औरंगाबाद: आजाराला कंटाळलेल्या रुग्णाची वाॅर्डात गुप्तांग कापून आत्महत्या

औरंगाबाद :किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या ४४ वर्षीय लक्ष्मण दामोजी गायकवाड यांनी घाटीतील वॉर्ड क्रमांक आठमध्ये गुप्तांग कापून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. गायकवाड काही महिन्यांपूर्वी राहुलनगर येथे राहण्यासाठी आले होते, परंतु आजारामुळे त्यांना घर विकावे लागले. गुरुवारी रात्री त्यांना त्रास झाल्याने घाटीत दाखल करण्यात आले. वाॅर्डात शेजारी कोणीच रुग्ण नसल्याचे पाहून त्यांनी गुप्तांग कापून घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला. गायकवाड रिक्षाचालक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुली एक मुलगा आहे. सहा दिवसांपूर्वीच ते पंढरपूर-फुलेनगर येथे बहिणीकडे राहण्यासाठी गेले होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर डायलिसिस सुरू होते. या प्रकरणाची एमआयडीसी वाळूज ठाण्यात नोंद झाली असून जमादार एस. जी. बागडे तपास करत आहेत.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *