श्रीनगर, दि. 6 – लष्कराच्या ताफ्यावर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून जवळपास सहा जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अनंतनाग येथील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ‘लष्कराचा ताफा राष्ट्रीय महामार्गावरुन लोअर मुंडा येथून जात असताना दक्षिण काश्मीरजवळील काझीगुंड येथे दहशतवाद्यांनी हल्ला चढवला’, अशी माहिती लष्कराच्या वरिष्ठ अधिका-याने दिली आहे. सहा जवान जखमी झाले असून गंभीर जखमी झालेला एक जवान शहीद झाला आहे. संपुर्ण परिसरात नाकांबदी करण्यात आली असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!!