👁 9 Views

सिध्देवाडी ते नागणेवस्ती रस्त्याच्या खडीकरणाचा आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते शुभारंभ

पंढरपूर तालुक्यातील सिध्देवाडी ते नागणेवस्ती या जि.प.सेस फंडातील रस्त्याच्या खडीकरणाचा शुभारंभ आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.सदस्य वसंतराव देशमुख हे होते.यावेळी पंचायत समिती सदस्या राजश्री भोसले व पांडुरंग साखर कारखान्याचे संचालक नागनाथ शिंदे,साहेबराव जाधव आदी उपस्थित होते.               यावेळी बोलताना आ.प्रशांत परिचारक म्हणाले की,जिल्हा परिषदेच्या कासेगाव गटात समाविष्ट असलेल्या गावाबरोबरच पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या 22 गावात विकास कामांसाठी निधी कमी  पडून देणार नाही.मुख्यंत्री ग्रामसडक योजना व डि.पी.डी.सी योजनेतून या भागातील सातत्याने मागणी  होत असलेल्या प्रमुख रस्त्याची कामे हाती घेतली जाणार आहेत. सिध्देवाडी ते नागणे वस्ती या रस्त्याच्या खडीकरणाचे काम करण्यात यावे अशी  मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत होती.जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून  या माध्यमातून या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे.जि.प.सदस्य वसंतराव देशमुख यांनी या कामासाठी विशेष बाब म्हणून सेस फंडातून निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पाठपुरावा केला होता.             यावेळी जयभवानी मजूर संस्थेचे चेअरमन सारंग जाधव,संतोष जाधव,बालाजी जाधव,बाबुराव गोडसे,रामचंद्र जाधव,रणजीत जाधव,सिध्देश्‍वर जाधव,अरुण जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *