👁 12 Views

कर्जबुडव्या विजय मल्ल्याची भारत-पाक सामन्याला उपस्थिती..,

सचिन व्हटे, पंढरपूर लाईव्ह

बर्मिंगहॅम : भारतीय बँकांचं 9 हजार कोटींचं कर्ज बुडवून पलायन केलेल्या मद्यसम्राट विजय मल्ल्याची लंडनमध्ये चांगलीच चंगळ सुरु आहे. इंग्लंडच्या एजबस्टन स्टेडियममध्ये सुरू असलेला भारत आणि पाकिस्तानमधला हाय व्होल्टेज सामना पाहण्यासाठी चक्क विजय मल्ल्या स्टेडियममध्ये हजर आहे.
देशभरातील प्रमुख बँकांना जवळपास 9 हजार कोटींचा चुना लावून लंडनमध्ये पळालेल्या विजय मल्ल्याला अखेर फरार घोषित करण्यात आलं आहे. त्याला भारतात परत आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
त्याला स्कॉटलंड पोलिसांनीही काही दिवसांपूर्वी अटक केली होती. पण काही तासातच त्याला जामीन मिळाला होता. पण आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीनिमित्त तो एजबस्टन मैदानात प्रेक्षकांमध्ये बसल्याचं कॅमेऱ्यानं टिपलं आहे.

विशेष म्हणजे, यावेळी त्याची सुनील गावस्कर यांनीही भेट घेतली. त्याचे फोटो ट्विटरवर ट्रोल होत आहेत. त्यामुळे कर्जबुडव्या विजय मल्ल्याला अजूनही व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत, असल्याचं दिसून येत आहे.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *