👁 12 Views

मनविभोरच्या वतीने करिअर बौद्धिक चाचणी शिबीर

पंढरपूर / प्रतिनिधी येथील मनविभोर या संस्थेच्या वतीने येत्या ११ जून रोजी पंढरपूर येथे बौध्दीक कल चाचणी आणि करिअर मार्गदर्शन शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. यांची माहीती विनया उत्पात , पूजा माने  आणि कैवल्य कुलकर्णी यांनी दिली आहे.         येथील तरूण युवक युवतीनीे मनविभोर ही संस्था साकारली आहे. या संस्थेच्या माध्यमातून येत्या ११ जून रोजी  येथील अर्बन बँकेच्या कर्मयोगी सभागृहात दुपारी चार वाजता सदरच्या शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.   या शिबीरामधे येणा-या प्रत्येक तरूणाची ही आधुनिक तंत्रज्ञानांच्या सहाय्याने कल चाचणी घेण्यात येणार आहे. तसेच यावेळी  डर्मोटोलापिÌक  मल्टीपल इंटेलिजन्स टेस्ट ( डीएमआयटी) या चाचणी संदर्भातील सखोल माहीती तसेच करिअर विषयींचे आणि निवडींचे यथायोग्य मार्गदर्शन करण्यात येणार आहे.   अशा शिबीरांसाठी सध्या मुंबई , पुणे  यांसारख्या शहरात हजारो रूपयांची फी  आकारणी होत असते. मात्र हेच शिबीर पंढरपूर येथे मनविभोरच्या माध्यामतून मोफत होणार आहे.    या शिबीरांधे पुणे येथील ममता सावजी या करिअर गायडन्य आणि डीएमआयटी विषायी मार्गदर्शनपर व्याख्यान देणार आहेत. त्यामुळे  पुणे मुंबई सारख्या मेट्रोसिटीनंतर पंढरपूरात प्रथमच असे एखोद डीएमआयटी आणि करिअर गायडन्स विषयीचे शिबीर होत असताना दिसून येत आहे. त्यामुळे  या शिबीरासाठी मोठया संख्येने तरूण तरूणी तसेच त्यांचे पालक यांनी उपस्थित रहावे. असे आवाहन हे मनविभोरच्या वतीने करण्यात आलेले आहे.



सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


                                                     

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *