👁 12 Views

राष्ट्रपती, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर!


नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगानं नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आज (बुधवार) राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर केली. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राष्ट्रपतीपदाची निवडणूक 17 जुलै 2017 रोजी होणार असून मतमोजणी 20 जुलैला होणार आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ पुढील महिन्यात म्हणजेच 25 जुलैला संपणार आहे. दरम्यान, यावेळी कोण राष्ट्रपती होणार याबाबत संपूर्ण देशात उत्सुकता आहे. एनडीए आणि यूपीएकडून कोणाला उमेदवारी दिली जाणार याकडे आता सगळ्यांचे डोळे लागून राहिले आहेत.
राष्ट्रपती निवडणुकीची प्रक्रिया :
– उमेदवाराच्या अर्जावर ५० प्रस्तावक, ५० अनुमोदक असणं गरजेचं.
– उमेदवाराला निवडणुकीसाठी १५ हजार रूपये अनामत रक्कम जमा करावी लागणार.
– संसद, राज्यांच्या विधानसभा, दिल्ली व पुडुच्चेरी या केंद्रशासित राज्यांच्या विधानसभा या ठिकाणी मतदान होणार
– गुप्त मतदान पद्धतीनं निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल.
– निवडणूक आयोगानं दिलेल्या विशेष पेनानंच मतदान केलं जाईल.
– यात मतदारांना पसंती क्रम द्यायचे असतात ( १ ते… जितके उमेदवार)
– राजकीय पक्ष या निवडणुकीसाठी कुठलाही व्हिप जारी करू शकत नाही.
– लोकसभेचे सेक्रेटरी जनरल, राज्यसभेचे सेक्रेटरी जनरल हे संसदेच्या मतदानासाठी निवडणूक अधिकारी
असा असेल राष्ट्रपती निवडणुकीचा कार्यक्रम:
– निवडणुकीची अधिसूचना १४ जून रोजी काढण्यात येईल.
– अर्ज करण्यासाठी शेवटी तारीख २८ जून असणार आहे.
– उमेदवारांच्या अर्जाची पडताळणी २९ जूनला होईल.  
– १ जुलै अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम तारीख असेल.
– मतदानाची गरज पडली तर १७ जुलैला मतदान होईल.
– मतमोजणी २० जुलैला होईल.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *