पुणे
भांडण करून माहेरी गेलेल्या पत्नीला नांदायला पाठवत नसल्याने चिडलेल्या नवऱ्याने सासऱ्याचा चाकूने भोसकून खून केला. मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास थेरगाव येथे ही घटना घडली असून या घटनेने थेरगाव हादरून गेले आहे.
शंकर गरड असे मृत व्यक्तिचे नाव आहे. पत्नीला नांदायला पाठवण्यासाठी आरोपी विनोद सुरवसे यांनी सासरे शंकर गरड यांना वारंवार विनंती केली होती. पण शंकर गरड मुलीला पाठवायला तयार नव्हते. त्यामुळे संतापलेल्या गरड यांनी गरड यांच्यावर चाकूने सपासप वार केले. त्यात गरड गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना गरड यांचा आज मृत्यू झाला आहे. दरम्यान स्वप्ना गरड यांनी आरोपी सुरवसे विरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान विनोद सुरवसे हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Posted inMaharashtra
पत्नीला नांदायला पाठवले नाही, सासऱ्याची हत्या
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





