07 जून : प्लॅस्टिक अंड्यांनंतर आता बंगळुरूत प्लॅस्टिक साखरेची भीती पसरतेय. हासन शहरात एका घरात प्लॅस्टिकची साखर आढळलीये. एवढंच नाहीतर पश्चिम बंगालमध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ सुद्धा आढळले.
बंगळुरमधील हासन शहरात एक महिला आपल्या घरात चहा बनवत होती. चहा ठेवून ती काही काम करायला बाहेरच्या खोलीत गेली. परत येऊन बघते तर भांड्यातून धूर येत होता. अशीच घटना गडग आणि टुमकूरमध्येही घडली. याचे नमुने लॅबमध्ये पाठवण्यात आलेत. हासनमध्ये आता लोक साखर घेताना अधिक काळजी घेत आहे
बंगळुरूत प्लॅस्टिकची साखर सापडली. तर पश्चिम बंगालमध्ये प्लॅस्टिकचे तांदूळ आढळून आलेत. जलपाईगुडी भागात हा प्रकार आढळून आलाय पण यामागे कोण आहे, याचा छडा अजून लागलेला नाही. याआधीही प्लॅस्टिकची अंडी असल्याची बातमी पसरली होती. मात्र, ही निव्वळ अफवा असल्याचं समोर आलं होतं.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे
संपर्क- 8308838111





