👁 8 Views

मद्याच्या बॉक्समधून ९५ लाखांचे सोने जप्त

मुंबई : दुबईहून विदेशी मद्याच्या बॉक्समधून सोने आयात करून आणणाऱ्या हिरे व्यापाऱ्याला आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करून ९५ लाखांचे सोने जप्त करण्यात आले. विपुलकुमार नथूभाई (वय ३३, रा. सुरत) असे त्याचे नाव आहे. हवाई गुप्तचर विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री ही कारवाई केली.

दुबईहून इमिरेट्स (ईके ५००) या फ्लाइटने मुंबईला येत असलेला नथूभाई सोन्याची तस्करी करीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. विमानतळावर त्याच्या सामानाची झडती घेतली असता, त्याच्याकडे प्रत्येकी दहा तोळे वजनाचे २७ सोन्याचे बार मिळाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत ९५ लाख आहे. विपुलकुमारने सोन्याच्या पट्ट्या टेपने गुंडाळून ‘जीम बीम’ या विदेशी मद्याच्या कंपनीच्या बॉक्समध्ये ठेवले होत्या. दारूच्या बॉक्सवर ड्यूटी फ्रीचा शिक्का होता, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *