या बैठकीत या बैठकीत शेतकरी कर्जमुक्तीचा मसुदा तयार होणार असल्याची माहिती मिळतेय.
शेतकरी संपावर तोडगा काढण्यासाठी रविवारी उच्चाधिकार मंत्रिगट आणि सुकाणू समितीच्या सदस्याची बैठक होणार आहे. या बैठकीत या बैठकीत शेतकरी कर्जमुक्तीचा मसुदा तयार होणार असल्याची माहिती मिळतेय.
कर्जमाफीसह शेतकर्यांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून मंत्रिगट नियुक्त करण्यात आलीये. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात एका उच्चाधिकार मंत्रिगटाची नियुक्ती केली आहे.
आज ही समिती स्थापन झाल्यानंतर सुकाणू समितीनेही चर्चेसाठी पुढे पाऊल टाकले आहे. रविवारी 11 जून रोजी सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी 1 वाजता मंत्रिगट आणि सुकाणू समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत शेतकरी कर्जमुक्तीचा मसुदा तयार होणार असल्याचं कळतंय.
सुकाणू समितीच्या पाच सदस्यांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आलंय. पुणतांब्याच्या तीन शेतकरी प्रतिनिधीही या बैठकीला हजर असणार आहे. स्वाभिमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू रघुनाथदादा पाटील यांच्याशी समिती चर्चा करणार आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111





