👁 12 Views

पंढरीच्या चंद्रभागा नदीपात्रात बुडून चार बालकांचा करूण अंत.. वाळुचोरांनी पाडलेल्या खड्डयांचे बळी!

पंढरपूर Live 10 jun
पंढरीच्या चंद्रभागेत  बुडून चार बालकांचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे.

गणेश जुमाळे (वय ८), धीरज जुमाळे (वय ८), श्रीपाद शहापूरकर(वय ६), सौरभ शहापूरकर(वय ६)  सर्व रा. विजापूर गल्ली, पंढरपूर अशी मयत झालेल्या दुर्दैवी बालकांची नावे आहेत.

चंद्रभागा घाट परिसरात दु. साडेचार वाजणेच्या सुमारास पाच मुले नदीपात्रात पोहोन्यास गेले असताना वाळुमुळे पडलेल्या खड्डयांचा अंदाज न आलेने ही मुले बुडाली. ह्या पाच पैकी सुदैवाने एक मुलगा वाचला आहे केदार जुमळ असे ह्या मुलाचे नाव असून त्यानेच ही माहिती दिलेली आहे असे समजते

येथील उपजिल्हा रुग्णालयात या बालकांवर उपचार सुरु असताना त्यांचा दुर्दैवी म्रुत्यु झाला.

ही बातमी कळताच उपजिल्हा रुग्णालयात नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी सदर बालकांचे आईवडील व नातेवाईकांना शोक अनावर झाला होता.
गहिवरून टाकणा-या या ह्रदयद्रावक घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *