पंढरपूर उपजिल्हा रुग्णायल कत्तलखाना- शंकर सुरवसे पंढरपूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष
उपजिल्हा रुग्णालयाच्या गैरकारभारा बद्दल बोलताना – पंढरपूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष शंकर सुरवसे
पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाचा निषेध
*सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी*
* युवक कॉग्रेसचे उपजिल्हा रुग्णालयासमोर उग्र आंदोलन *
येथील चंद्रभागा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्डयात बडून चार बालकांचा मृत्यु झाल्याची दुर्घटना घडली असून या घटनेमुळे संपुर्ण पंढरपूर शहरावर शोककळा पसरली आहे.या बालकांना पाण्यातून काढल्यानंतर तातडीने येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.मात्र यावेळी येथे उपस्थित असलेल्या कर्मचार्यांनी उपचार करण्या ऐवजी शहरातील इतर दवाखण्यात नेण्यास सांगीतले.यामुळे या चारही बालकांना घेवून खाजगी रुग्णालयाकडे धाव घ्यावी लागली.तेथुन पुन्हा या बालकांना उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.यावेळी एक बालकाचा जिव वाचू शकला असता मात्र सदर बालकास आक्सिजन देण्यासाठी लावण्यात आलेले सिलेंडरही रिकामे होते.अशा प्रकारचा गंभीर हलगर्जीपणा या रुग्णालयातील कर्मचार्यांकडून घडला असून त्यामुळे या घटनेतील एका मुलाच्या मृत्युस जबाबदार धरुन या कर्मचार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व या पिडीत कटुंबास शासनाकडुन त्वरीत अर्थिक मदत मिळावी अशी मागणी पंढरपूर शहर युवक कॉग्रेसच्या वतीने राज्याचे अदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे व पोलीस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबत सातत्याने नागरिकांचा संताप व्यक्त होत असतो.मात्र कालच्या दुर्घटनेमुळे आता रुग्णालयाच्या भोंगळ कारभारा विरोधात आज युुवक कॉग्रेसने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच हा कत्तल खाना बंद करा अशा घोषणा देत उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाचा व राज्यातील भाजपा सरकारचा निषेध केला.यावेळी जिल्हा सरचिटणीस अमर सुर्यवंशी,शहर कॉग्रेस कमेटीचे अध्यक्ष ऍड.राजेश भादुले,उपाध्यक्ष प्रा.अशोक डोळ,युवक कॉग्रेसचे अध्यक्ष शंकर सुरवसे,उपाध्यक्ष वीर शेख व अभिषेक शहा,ओबीसी सेलचे समिर कोळी,शिवाजी धोत्रे,राष्ट्रवादी युवकचे शहर कार्याध्यक्ष भास्कर जगताप,उपाद्यक्ष निलेश कोरके,छावा संघटनेचे सागर चव्हाण,सोपान देशमुख,युवक मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष सुमित शिंदे,समाजसेवक मनोज भुईटे,गोविंद कांबळे आदी उपस्थित होते.

आज पंढरपूर live सोबत बोलताना शंकर सुरवसे- पंढरपूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष

या मागणीचे निवेदन डीवायएसपी निखील पिंगळे यांना देण्यात आले.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111