चंद्रभागेतील वाळु चोरीचा प्रश्न ऐरणीवर! निष्क्रीय महसुल खात्याच्या अधिका-यांवर नागरिक आणि भाविकांमधून तीव्र संताप!
पंढरपूर Live दि.१३ जुन.२०१७
आज पंढरीत चंद्रभागेच्या पात्रात बुडून वयस्क भाविकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. चंद्रभागेत बुडून चार बालकांचा करूण अंत झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एक बळी असाच गेला.. या घटनेमुळे पुन्हा एकदा चंद्रभागेतील वाळु चोरीचा प्रश्न ऐरणीवर आला असून निष्क्रीय महसुल खात्याच्या अधिका-यांवर नागरिक आणि भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे!
पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार आज दु. अडीच वाजणेपुर्वी चंद्रभागेच्या विप्रदत्त घाट येथे बाळासो आण्णा लोहार (वय ७२) रा. महादेव गल्ली, वशी, ता. वाळवा, जि. सांगली या भाविकाचा पाण्यात बुडून म्रुत्यू झाला.
या दुर्घटनेची खबर पंढरपूर शहर पोलीस ठाणेत मदन मोहन शिंदे, रा. कालिका देवी चौक, पंढरपूर यांनी दिली असून अधिक तपास पो.हे.काँ. कांबळे हे करीत आहेत.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



