👁 10 Views

अंधश्रद्धेचा कळस! मुलीला खावे लागले शेण

लातूर – पुरागामीत्वाच्या गप्पा मारणाऱ्या महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या अनिष्ट प्रथा कधी बंद होणार हा प्रश्‍न आजही अनुत्तरीत आहे. ग्रामीण भागात आजही अंधश्रद्धा किती मोठ्या प्रमाणात पाळली जाते, याची प्रचिती देणारी घटना लातूर जिल्ह्यात घडली. जिल्ह्यातील धनगरवाडी येथे अंधश्रद्धेपोटी एका 17 वर्षाच्या मुलीला शेण खाण्यास लावल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. 6 जून रोजी घडलेल्या या घटनेने अंधश्रद्धेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मुलीला भानामती झाल्याने तिने शेण खाल्ल्याशिवाय तिची भानामती कमी होणार नाही, असा दावा एका भोंदूबाबाने केला होता. त्यानुसार या मुलीला शेण खाण्यास लावण्यात आले. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाचे चित्रिकरण करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही करण्यात आला. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. या घटनेतील दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *