सोलापूर दि. 13 : – जिल्ह्यात आज, मंगळवार, 13 जून 2017 सकाळी 8 वाजता संपलेल्या गेल्या 24 तासात एकूण 270.10 मि.मी. पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 24.55 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 99.24 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढील प्रमाणे : उत्तर सोलापूर – 12.36, दक्षिण सोलापूर – 17.14, बार्शी – 20.45 , अक्कलकोट – 26.44, मोहोळ – 27.15 , माढा – 22.49, करमाळा – 14.75, पंढरपूर – 19.56, सांगोला – 43.56, माळशिरस – 41.00 , मंगळवेढा – 25.20
साेलापूरमध्ये दहा दिवसांत ७४ मिमी
सोलापूर जिल्ह्यात पावसाळ्याची दमदार सुरुवात झाली आहे. मागील दहा दिवसांत सरासरी ७४ मि.मी. पाऊस झाला आहे. मागील वर्षी ५३ मि.मी. इतका पाऊस झाला होता. एक ते १२ जून या कालावधीत ४० मि.मी. पाऊस अपेक्षित होता, प्रत्यक्षात ७४.६८ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. माेहाेळ तालुक्यातील शेटफळ येथे सायंकाळी चारच्या सुमारास वीज अंगावर पडून पांडूरंग अंकुश भांगे (वय ३२) यांचा मृत्यू झाला.