क्रमश :
एक्यूयोगा (Acuyoga)
४) पोटाचे आजरा
स्टमक एक्यूयोगा करावा. बद्ध कोष्टसाठी एक्यूयोगा मधील २५ वि क्रिया करावी.
५” ते ७” व्यासाचा मेडिसिन बॉल (जिम बॉल) , किंवा रबरी बॉल घ्यावा. जमिनीवर पालथे झोपावे. बॉल पोटाखाली घ्यावा. हात जमिनीवर पालथे ठेवून पाय सरळ करून फक्त बॉलवर पोटाचा दाब ध्यावा, पोट घडयाळाच्या कोटीच्या विरुद्ध दिशेने बॉलवर फिरवावे. पोटाच्या सर्व तक्रारी दूर होतात.
तसेच वज्रासन करावे. यामुळे St -३६, ३७, ३९, ४०, ४१ या बिदूवर दाब येतो. त्यामुळे लहान आतडे, मोठे आतडे आणि पचनकशक्ती याचे कार्य सुधारते. वज्रासन रात्री जेवण झाल्यावर झोपण्यापूर्वी १ ते ५ मिनिटे करता येते. हे आसन पूर्ण जमत नसल्यास पोटरी (पिढरी) आणि मांडी यामध्ये १ ते २ उशी घ्यावी.





