पुणे- पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका 20 वर्षीय तरुणाने मैत्रिणीवर ब्लेडने हल्ला केला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. ओंकार राऊत असे हल्ला करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही ओंकार राऊत (वय. 20, रा. लिंक रोड, पत्रा शेड झोपडपट्टी) याची मैत्रीण आहे. ती काही महिन्यांपासून ओंकारशी बोलत नव्हती. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास पीडित तरुणी एकटी असताना रागाच्या भरात ओंकारने तिच्या हातावर आणि पोटावर ब्लेडने वार केले. या तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत, अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे.
तरुणी का बोलत नव्हती युवकाशी?
पीडित तरुणी आणि ओंकार हे शेजारी राहतात. या दोघांच्या मैत्रीत घरच्यांनी उडी घेत तुम्ही दोघांनी बोलायचे नाही असे सांगितले होते. त्यामुळे पीडित मुलगी ही ओंकार बरोबर बोलत नव्हती. याच रागातून ओंकारने हे पाऊल उचलले आहे. राऊत याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड हे करत आहेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




