मुंबई, दि. 19 : कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत येणाऱ्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत संचालनालयाच्या लोगोची रचना (डिझाईन) करण्यासाठी खुली स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
राष्ट्रीय कौशल्य दिन 15 जुलै 2017 रोजी साजरा केला जात असून या दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट लोगोची रचना केलेल्या प्रथम तीन स्पर्धकांना व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाकडून गौरविण्यात येईल. विशेष म्हणजे प्रथम क्रमांकासाठी निवड झालेला लोगो यापुढे संचालनालयाचा अधिकृत लोगो म्हणून वापरला जाणार आहे.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यात शासकीय आणि खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम, द्विलक्षी अभ्यासक्रम, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, प्रमाणपत्र अभ्यासक्रम इत्यादी अभ्यासक्रमांच्या माध्यमांतून तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्य देणाऱ्या शासकीय आणि खाजगी संस्थांची दिवसागणिक वाढ होत आहे.
औद्योगिक आस्थापनांच्या बदलत्या गरजांनुसार उमेदवारांना आधुनिक दर्जाचे प्रशिक्षण देत असताना विभागातील प्रशासनिक बाबींमध्येही कालसुसंगत बदल करणे आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत लोगो निश्चित करण्यासाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी 5 जुलै 2017 पर्यंत dvet.logo@dvet.gov.in या ईमेलवर लोगोबाबत आणि इतर माहिती भरुन पाठवावी. लोगो तयार करताना विभागाची मुळ संकल्पना/ कार्यभाग/स्वरुप यामधून प्रतित होईल, याची काळजी घ्यावी,असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत करण्यात आले आहे. बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



