👁 9 Views

विदेशी पर्यटकांसाठी बहुभाषिक हेल्पलाईन

मुंबईदि.19 : भारतात पर्यटनासाठी आलेल्या विदेशी पर्यटकांच्या समस्या सोडविण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने 24 तास सेवा देणारी बहुभाषिक हेल्पलाईन सुरू केली आहे. पर्यटनस्थळांची माहिती अथवा पर्यटनासंदर्भातील सुविधांच्या माहितीसाठी 1800111363/शॉर्ट कोड 1363 येथे संपर्क साधावा असे आवाहन केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फे करण्यात आले आहे.
या हेल्पलाईनद्वारे इंग्रजीहिंदी बरोबरच अरेबिकफ्रेंचजर्मनीइटालियनजापनिजकोरियनचायनिजपोर्तुगिजरशियन आणि स्पॅनीश या दहा आंतरराष्ट्रीय भाषांमधून माहिती दिली जाणार आहे. विदेशी पर्यटकांना भारतात पर्यटनाच्या सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात, भारतात मोठ्या प्रमाणावर पर्यटनाला चालना मिळावी या दृष्टीने ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. यंदाचे वर्ष हे व्हिजिट महाराष्ट्र वर्ष म्हणून घोषित केले असल्याने त्या धर्तीवर ही बहुभाषिक हेल्पालाईन महत्त्वाची ठरणार आहे.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *