👁 10 Views

एनडीए कडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी, पंढरीत आदिम विकास परिषदेने पेढे वाटून केला आनंद व्यक्त

भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने आपल्या राष्ट्रपतीपदासाठीरामनाथ कोविंद यांना उमेदवारी जाहीर केली आहे.रामनाथ कोविंद हे अखिल भारतीय कोळी समाजाचे अध्यक्ष राहीले असून अदिवासी कोळी समाजाच्या प्रश्‍नासाठी त्यांनी लढा दिला आहे.देशाच्या राष्ट्रपतीपदासारख्या सव्वोर्च पदासाठी सत्ताधारी आघाडीकडून त्यांची उमेदवारी जाहीर झाल्याने सोलापूर जिल्हा अदिम विकास परिषदेच्या वतीने पंढरीतील संत नामदेव पायरी येथे पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
             यावेळी बोलताना अदिम विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश अधटराव म्हणाले की,अदिवासी कोळी समाज देशभरात विखुरलेला आहे.देशातील अनेक राज्यात या समाजाला विविध प्रवर्गात विशेषत: एस.टी.प्रवर्गात आरक्षण दिले गेले आहे.रामनाथ कोविंद यंानी कोळी समाजाचे राष्ट्रिय अध्यक्षपद भुषिवीले असून कोळी समाजाच्या प्रश्‍नांची त्यांना जाण आहे.देशाच्या राष्ट्रपती पदासाठी त्यांची सत्ताधारी एन.डी.ए.आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांचा विजय निश्‍चित आहे.अदिवासी कोळी समाजातील व्यक्तीस देशाचे सव्वोर्च पद मिळत असल्याने आम्ही पेढे वाटून आनंद साजरा करीत आहोत असे ते म्हणाले.

       यावेळी अदिम विकास परिषदेचे सोमानाथ कोळी,प्रशांत परचंडे,सागर पंाढरे,संकेत परचंडे,गणेश कोळी,साहील कोताळकर,धिरज परचंडराव,रोहीत कोळी,शैलेश अभंगराव यांच्यासह असिफ शेख,ज्ञानेश वाघुले,निलेश सदावर्ते,भैय्या पवार,औदुंबर औसेकर,माधव मिेरखे,ओकांर कोळी आदी उपस्थित होते.  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *