👁 9 Views

योग भारतीय संस्कृतीने दिलेली अमूल्य देणगी – महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे


डोंगरीच्या निरिक्षण गृहात साजरा झाला आंतरराष्ट्रीय योग दिन
मुंबईदि. 21 : योग ही भारतातील पाच हजार वर्ष जूनी शारीरिकमानसिक अध्यात्मिक साधना असून ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते. योग भारतीय संस्कृतीने जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे असे महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे  सांगितले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त  उमरखाडीडोंगरी येथील निरीक्षण गृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. एकात्मिक बाल विकास प्रकल्पाचे आयुक्त कमलाकर फंड यांच्यासह योग प्रशिक्षकचिल्ड्रन एड् सोसायटीचे अधिकारी कर्मचारी यावेळी  उपस्थित होते.
मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या कीशारीरिक व मानसिक आरोग्याचे निवारण होण्यासाठी नियमित योगासने करणे गरजेचे आहे असा सल्ला अनेक योग अभ्यासक देतात. रोग निवारण्याच्या या पध्दतीला आता आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. संयुक्त राष्ट्राने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे.  मानवाला आपले ध्येयउद्दिष्ट साध्य करण्यासाठी शरीर सदृढ ठेवणे गरजेचे असते. यामुळे नियमित योग करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. एक तास नियमित योग करण्याचा संकल्प आजपासून केला असल्याचे श्रीमती मुंडे म्हणाल्या.
या प्रसंगी मंत्री मुंडे यांनी निरीक्षण गृहातील मुलां मुलींसोबत योग साधनेच्या कपाल भातीअनुलोम-विलोमभ्रामरीभसरीकाओम ध्यान तसेच ताडासनवृक्षासन आदि आसनेही केली. यावेळी मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते सर्व निरीक्षण गृहातील मुलां मुलींना फळवाटप करुन योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *